शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 28 जुलै 2021 (09:32 IST)

हरियाणा ते बिहारकडे जाणाऱ्या बसचा अयोध्यामध्ये झालेल्या अपघातात 18 ठार

उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे झालेल्या भीषण रस्ता अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील रामस्नेहीघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत लखनौ-अयोध्या राष्ट्रीय महामार्गावर एका डबल डेकर बसला मागून वेगाने येणाऱ्या अनियंत्रित ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला, तर 19 लोक जखमी झाले. सर्व जखमींना लखनौ ट्रॉमा सेंटर येथे हलविण्यात आले आहे. मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. बस हरियाणाहून बिहारकडे जात असल्याचे सांगण्यात येत आहे
 
बाराबंकी येथील अयोध्या सीमेवरील कल्याणी नदी पुलावरील डबल डेकर बस रात्री एक च्या सुमारास एक्सल तुटल्या मुळे बंद पडली. मुसळधार पावसामुळे चालक व ऑपरेटर बस बाजूला लावून बस दुरुस्त करत होते.दरम्यान, वेगाने लखनौच्या दिशेने जाणाऱ्या एका अनियंत्रित ट्रकने बसला धडक दिली. ही टक्कर इतकी जोरदार होती की त्यातील बहुतेक जागीच ठार झाले.
 
लखनौ झोनचे एडीजी सत्य नारायण सबत यांनी सांगितले की, बाराबंकीतील राम स्नेही घाटजवळ काल रात्री उशिरा एका ट्रकने बसला धडक दिली. या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला आहे तर 19 जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसखाली अडकलेल्या मृतदेह बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.
रात्री 3 :30 पर्यंत चार जणांचे मृतदेह घटनास्थळी अडकले होते, तर 11 जणांच्या मृत्यूची पुष्टी सीएससी रामस्नेही घाट यांनी दिली. तर बाराबंकी जिल्हा रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला.एकूण 18 बस प्रवाश्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सुरेश यादव,इंदल महतो,सिकंदर मुखिया,मोनू सहनी,जगदीश सहनी,जय बहादुर साहनी, बैजनाथ राम, बलराम अशी अद्याप ओळख पटली आहे.अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावर पाच किलोमीटर लांब जाम होते. मुसळधार पावसामुळे पोलिसांनाही सुमारे अर्ध्या तासानंतर घटनेची माहिती मिळाली.