गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 ऑगस्ट 2022 (16:42 IST)

नागपुरात पेट्रोल पिऊन विद्यार्थ्याची कॉलेजच्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या

death
19 वर्षीय विद्यार्थ्याने पेट्रोल पिऊन कॉलेजच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. शिवम कटारे असे या मयत तरुणाचे नाव असून तो BCA च्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. सेंट फ्रान्सिस डिसेल्स महाविद्यालयातील विद्यार्थी शुभम सकाळी महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी आला नंतर तो कॉलेजच्या चौथ्या मजल्यावर गेला आणि त्याने तिथून उडी मारली. त्याच्या डोक्याला जबर मार लागलातो रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी प्राथमिक तपासात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 
 
मयत शुभम हा काही दिवसांपासून तणावाखाली असल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले माझ्या कडून ते होऊ शकणार नाही सतत असं म्हणायचा.त्याने सर्वांशी बोलणे बंद केले आणि तो एकटाच राहायचा. आज तो एकटाच कॉलेजच्या इमारतीवर गेला आणि त्याने आपले आयुष्य संपविले.शुभमचे  वडील मोरेश्वर कटारे इलेक्ट्रिशियन असून मुलाच्या अकस्मात मृत्यूने धक्क्यात आहे.