मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 जुलै 2022 (13:55 IST)

नागपुरात अंत्यसंस्कारासाठी चिता पेटवताना आगीचा भडकेत दोघांचा होरपळून मृत्यू

नागपूरच्या कामठी येथे अंत्यसंस्कारासाठी चिता पेटवताना डिझेलचा भडका उडून त्यात अंत्यसंस्कारासाठी आलेले तिघे भाजले त्यात दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिलीप गजभिये आणि सुधीर डोंगरे अशी या मयत व्यक्तींची नावे आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी कामठीच्या राणी तलाव मोक्षधाम येथे सिद्धार्थ अंतुजी नावाच्या व्यक्तीच्या मृत्यू झाला. त्याच्या अंत्यसंस्काराच्या सुधीर महादेव डोंगरे, दिलीप घनश्याम गजभिये आणि सुधाकर बुधाजी खोब्रागडे हे आले असता चिता पेटवताना ओतलेला डिझेल मुळे आगीचा भडका उडाला आणि त्यात हे तिघे गंभीर जखमी झाले असता त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. त्यात दिलीप गजभिये आणि सुधीर डोंगरे यांचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.