खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू,नागपूरची घटना
सध्या राज्यात सर्वत्र पावसाने झोडपले आहेत. रस्त्यावर नदी नाल्यात पाणी ओसंडून वाहत आहे. शेततळे खड्डे पाण्याने तुडुंब भरले आहे. खड्ड्याच्या पाण्यात पडून बुडून एका 12 वर्षाचा मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना नागपुरात डीपट्टी सिग्नल ते शांतीनगर दरम्यान घडली आहे.पृथ्वी मार्कंडे असे या मृत्युमुखी झालेल्या मुलाचे नाव आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने डीपट्टी सिग्नल ते शांतीनगर दरम्यान भुयारी मार्गासाठी खड्डा खणला होता पण हे काम अनेक दिवसांपासून रखडले होते. पावसामुळे या खड्ड्यात पाणी साचले होते. काल पृथ्वी आपल्या मित्रांसह खेळायला गेला असता त्याचा या खड्ड्यात पडून बुडून दुर्देवी मृत्यू झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिरंगाईमुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप नागरिक करत आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.