बुधवार, 6 डिसेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 23 जुलै 2022 (12:24 IST)

young men died in railway accident: मस्तीतून तोल जाऊन तरुणाची ट्रेनला धडक

रेल्वे प्लॅटफॉर्मवर मस्ती करणं एका तरुणाच्या अंगाशी आलं. या मध्ये तरुणाला आपला  जीव गमवावा लागला आहे. ही दुर्देवी घटना पश्चिम रेल्वेवरील कांदिवली रेल्वेस्थानकावर गुरुवारी दुपारी 4:40 वाजता घडली. हा संपूर्ण अपघात सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. 
 
कांदिवली रेल्वे स्थानकात दोन तरुण हुल्लडबाजी करत होते. ते दोघे आपसात मस्ती करत होते. मस्ती करताना अचानक एका मित्राचा रेल्वे रुळावर तोल गेला आणि मागून येणाऱ्या लोकल ट्रेनची त्याला धडक लागली. आणि त्याचा मृत्यू झाला. ही  संपूर्ण काळीजचा थरकाप उडवणारी घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. 
 

या मध्ये दिसत हे की  दोघे मित्र आपसात मस्ती करत आहे. आणि अचानक एक मुलगा तोल जाऊन स्थानकाच्या खाली पडणार तेवढ्यात वेगाने येणाऱ्या ट्रेनची त्याला धाड बसते. हे सर्व  अतिशय वेगानं घडलं की  कोणालाही काहीही समजायला वेळच मिळाला नाही. यावेळी मुलाच्या आजूबाजूने जाणाऱ्या प्रवाशांना मोठा धक्का बसतो. नेमकं काय घडलं ते त्यांना तातडीने समजत नाही. ते त्या मुलाला बघण्याचा प्रयत्न करतात. पण लोकल ट्रेन धावत गेल्याने मुलगा स्पष्टपणे दिसत नाही. अवघ्या क्षणार्धात हे सगळं घडतं.
 
या घटनेप्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून त्याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. मयत मुलाची माहिती अद्याप मिळू शकली नाही.