गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 जुलै 2022 (13:02 IST)

Python Viral Video: टिटवाळ्यात ऑटोरिक्षातील प्रवाशांच्या सीटभोवती भला मोठा अजगर, व्हिडीओ व्हायरल!

Python Viral Video:सोशल मीडियावर अनेकदा अजगर आणि सापांचे व्हिडिओ पाहायला मिळतात, ज्यामुळे लोकांना आश्चर्याचा धक्का बसतो. स्कूटी किंवा कारमध्ये साप रेंगाळत असल्याचा व्हिडिओ तुम्ही अनेकदा पाहिलाच असेल, आता मुंबईला लागून असलेल्या टिटवाळ्यातील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, या व्हिडीओ मध्ये एक भलामोठा अजगर ऑटो रिक्षात प्रवाशांना सीटवर असलेला दिसत आहे. प्रवाशी सीट वर भलामोठा अजगर पाहून रिक्षा चालक घाबरला. 
 
 या व्हिडिओमध्ये प्रवाशांच्या सीटवर सुमारे 5 फुटाचा अजगर रेंगाळत आहे, ज्याला पाहून एक व्यक्ती त्याला वाचवतो. अजगराला पकडून, एक माणूस त्याला जवळच्या निळ्या ड्रममध्ये ठेवतो.