गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (16:51 IST)

कोरोनानंतर आता मुंबईत स्वाइन फ्लूचा प्रसार झपाट्याने वाढत आहे, 4 रुग्ण व्हेंटिलेटरवर

महाराष्ट्रात कोरोनानंतर आता स्वाइन फ्लूने भीतीचे वातावरण पसरवले आहे. मुंबईत सध्या स्वाइन फ्लूची लागण झालेले किमान 4 जण व्हेंटिलेटरवर आहे. शहरात पुन्हा एकदा स्वाइन फ्लूचा फैलाव होत आहे. ज्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह येत आहे त्यांनी स्वाईन फ्लूची चाचणी करून घ्यावी, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

या महिन्यात आतापर्यंत स्वाइन फ्लूच्या एकूण 11 रुग्णांची पुष्टी झाली आहे. कोविड-19 प्रमाणेच H1N1 हा एक श्वसन रोग आहे जो 2019 मध्ये जागतिक महामारी म्हणून सुरू झाला होता.
 
वांद्र्याच्या लीलावती रुग्णालयात, 50 ​​वर्षांखालील दोन रुग्ण एक्स्ट्राकॉर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन (ECMO) थेरपीवर आहेत. ज्याला शेवटचा उपाय मानला जातो. आणि व्हेंटिलेटर सपोर्ट अयशस्वी झाल्यासच दिला जातो. हॉस्पिटलमध्ये स्वाइन फ्लूने वॉर्डात आणखी 5 रुग्ण दाखल आहेत. मुंबईत स्वाइन फ्लू आणि कोरोना व्हायरसमध्ये टक्कर असल्याचं बोललं जात आहे.