शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 ऑगस्ट 2022 (20:55 IST)

अमरावतीत नागपूर-औरंगाबाद महामार्गावर दोन ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू

अमरावतीत नागपूर-औरंगाबाद महामार्गावर दोन ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही ट्रकमधील चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. महामार्गावरील खड्डा वाचवताना हा अपघात झाला. अपघातामूळे बराच वेळ महामार्गावरील वाहतूक खोळंबली. त्यामुळे तब्बल 8 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
 
या अपघातात दोन्ही ट्रकचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. लोखंडी गज (बार) घेऊन ही ट्रक जात होती. मात्र, दरम्यान नागपूर-औरंगाबाद महामार्गावर रस्त्यावरी खड्डा चुकवताना हा अपघात झाला. अपघातामुळे ट्रकमधील लोखंडी सळई ट्रकमधील प्रवाशांच्या शरीरात आरपार घुसून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

औरंगाबाद कडून नागपूरकडे जाणारा ट्रक क्रमांक CG04HZ 8154 होता. शिंगणापूर फाट्यावरून पाचशे मीटर अंतरावर RJ04 GC2258 नागपूर कडून औरंगाबाद कडे जाणारा ट्रक होता. दोन्ही ट्रक एकमेकांवर कोसळले. परिसरात महामार्गावरील खड्डा वाचवताना अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.अपघाता नंतर वाहनांच्या 20 किलोमीटर पर्यत लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.