बापाने पोरांना दारु पाजली
आई बाप हे दोघंही मुलांच्या पालन पोषणात, मुलांना शिस्त लावण्यात महत्वाची भूमिका बजावतात. खरंतर आई मुलांचे लाड करतो, बाप पोरांना शिस्त लावतो, असा एक स्टिरीओटाईप समज आहे. तसं म्हटलं तर बापाने लपून छपून दारु पिण्याचे दिवसही केव्हाचेच मागे सरलेत. पण दिवस इतकेही पढारलेपणाचे आलेले नाहीत, की बाप चक्क आपल्या चिमुरड्या पोरांसोबत दारू ढोसेल. इतकंच काय तर त्यांनाही दारु पाजेल. हे काही पुढारलेपणाचं लक्षण नक्कीच नाही. पण असा विचित्र प्रकार अमरावतीत समोर आला आहे.
एक बाप आपल्याच चिमुरड्या पोरांना दारु पाजतोय. एकूण पाच लोकं मिळून दारुजी पार्टी करतायत. यात एक अल्पवयीन मुलगाही दिसतोय. एक लहान मुलगी आणि एक अगदीच चिमुरडा आहे. या सगळ्यांसोबत चिमुरड्यांचा बापही समोर बसलाय. तर पाचवा व्यक्ती व्हिडिओ काढतोय. दारु पार्टीचा हा झिंगाट व्हिडिओ काढताना सगळ्यांनाच मजा येत होती. पण आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बाप नेमके आपल्या पोरांवर कसेल संस्कार करतोय, यावुरून चर्चांना उधाण आलंय.