शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 28 डिसेंबर 2016 (10:43 IST)

पुतळे उभारणे म्हणजे स्मारक नव्हे: राज ठाकरे

‘स्मारकाच्या माझ्या संकल्पना वेगळ्या आहेत, पुतळे उभारणे म्हणजे स्मारक नव्हे’असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर पुन्हा टीका केली आहे. नाशिकमध्ये पांडवलेणीच्या पायथ्याशी उभारण्यात आलेल्या बॉटिनिकल गार्डनमधल्या लेझर शोसह इतर विकासकामांचा लोकार्पण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. त्यावेळी राज ठाकरे बोलत होते.

या कार्यक्रमावेळी अभिनेते नाना पाटेकर यांनीह राज ठाकरेंचं तोंडभरुन कौतूक केलं ‘राज जे करतो ते पराकोटीचं चांगल असतं. माणूस म्हणून मी राज तुमचा आभारी आहे. खूप छान काम केलं. अजूनही कुठल्या शहरात तू निवडून आला तर बर होईल. अशी छान काम तिथेही होतील.’ असे सांगीतले.