राज ठाकरे सावध झाले; 'शिवतीर्थ' निवासस्थानी मनसे नेते आणि नगरसेवकांची तातडीची बैठक बोलावली
राज ठाकरेंची महत्त्वाची बैठक बोलवली. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी 'शिवतीर्थ' निवासस्थानी मनसेचे नेते आणि नगरसेवकांची तातडीची बैठक बोलावली असून, यात मुंबई महानगरपालिका आणि संघटनात्मक विषयांवर चर्चा सुरू आहे. अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज, २३ जून २०२६ रोजी त्यांचे मुंबईतील निवासस्थान 'शिवतीर्थ' येथे मनसे नगरसेवकांची तातडीची आणि महत्त्वाची बैठक बोलावली. यात मुंबई महानगरपालिका (BMC) संबंधित मुद्दे आणि पक्षातील संघटनात्मक विषयांवर चर्चा होत आहे.
मुंबई महानगरपालिकेतील मनसेच्या भूमिका, नगरसेवकांच्या कामकाजाचा आढावा.
पक्षातील अंतर्गत संघटनात्मक बळकटीकरण आणि भविष्यातील रणनीती.
नुकत्याच झालेल्या BMC निवडणुकीनंतरची स्थिती, नामनिर्देशित सदस्यांसंबंधी चर्चा हे या बैठकीतील मुद्दे असल्याचे सांगितले जात आहे. तसेच राज ठाकरे स्वतः उपस्थित असून ही बैठक मनसेला पुन्हा सक्रिय करण्याचा भाग म्हणून पाहिली जात आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटाचे काही खासदार आणि आमदार फुटणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'ऑपरेशन टायगर'मुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मनसेकडून खबरदारी
मिळालेल्या माहितीनुसार खासदारांनंतर आता मुंबई महानगरपालिकेतील (BMC) माजी नगरसेवकांवरही राजकीय नेत्यांची नजर आहे. या पार्श्वभूमीवर मनसेमध्ये कोणतीही फूट पडू नये म्हणून राज ठाकरे कमालीचे सावध झाले आहे. या तातडीच्या बैठकीत राज ठाकरे स्वतः उपस्थित नगरसेवकांशी थेट चर्चा करत आहे. बदलत्या राजकीय समीकरणांनुसार पक्षाची ताकद आणि अंतर्गत संघटना मजबूत करण्यावर भर दिला जात आहे.
Edited By- Dhanashri Naik

