गुरूवार, 6 ऑक्टोबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified बुधवार, 4 मे 2022 (21:41 IST)

राज ठाकरेंनी पुन्हा एकदा उद्धव यांना डिवचले; शेअर केला बाळासाहेबांचा व्हिडिओ

भोंग्यांच्या वादात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डिवचले आहे. राज यांनी कालच मुख्यमंत्र्यांना उद्देशून एक पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी एकदाचे होऊन जाऊ द्याच असे खुले आव्हान दिले होते. त्यास काही तास उलट नाही तोच राज यांनी आणखी एक तीर मारला आहे. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या एका भाषणाचा व्हिडिओ राज यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओत दिसत आहे की, बाळासाहेब जनतेला उद्देशून भाषण करीत आहेत. त्यात ते म्हणत आहेत की, जेव्हा आमचं (शिवसेनेचं) सरकार येईल तेव्हा रस्त्यावरील नमाज पठण बंद होईल. तसेच, मशिदींवरील भोंगे सुद्धा उतरविले जातील.
 
राज यांनी कालच्या पत्रातच उद्धव यांना म्हटले होते की, आपण बाळासाहेबांचे ऐकणार आहात की शरद पवार यांचे. त्यानंतर आता थेट बाळासाहेबांचा व्हिडिओ ट्विट करुन राज यांनी उद्धव यांनी आणखी एकदा डिवचले आहे. राज यांच्या कालच्या पत्राला आणि आज शेअर केलेल्या व्हिडिओला आता उद्धव ठाकरे हे काय उत्तर देतात किंवा काय मोठा निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.