मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 जून 2020 (11:09 IST)

राज ठाकरेंच्या 3 सुरक्षा रक्षकांना झाली करोनाची लागण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या तीन सुरक्षा कर्मचार्‍यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे उघडकीस आले आहे. यानंतर ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्मित झालं आहे. परंतू सूत्रांप्रमाणे या तिन्ही पोलिसांनी करोनावर मात केली असून आता ते करोनामुक्त झाले आहेत.
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 14 जूनला वाढदिवस असतो. पण कोरोनाच्या परिस्थतीमुळे यंदा वाढदिवस साजरा करणं अजिबात उचित नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा द्यायला येऊ नये, असा आदेश दिला आहे. त्याऐवजी आहे तिथेच जनतेला मदत करा, अशा सूचना देणारं जाहीर पत्रच कार्यकर्त्यांना उद्देशून राज यांनी लिहिलं आहे.
 
दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. धनंजय मुंडे यांचे दोन स्वीय सहाय्यक आणि गाडी चालकाला देखील कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्री मंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत धनंजय मुंडे सहभागी झाले होते.