रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 जुलै 2022 (21:52 IST)

१३ जुलैला राज ठाकरे बैठकीला संबोधित करणार

Raj Thackeray
मनसे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. येत्या १३ जुलै रोजी मनसेचे महत्वाचे नेते, सरचिटणीस आणि विभाग अध्यक्षांची बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला स्वत: राज ठाकरे संबोधित करणार आहेत.
 
राज ठाकरेंच्या पायावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना काही काळ आरामाचा सल्ला दिला होता. राज ठाकरे सक्रियरित्या पक्ष कार्यक्रमात भाग घेऊ शकत नसले तरी त्यांचा सुपुत्र अमित ठाकरे गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या दौऱ्यावर आहे. अमित ठाकरे यांनी नुकतंच कोकण दौरा केला. यात अमित ठाकरेंनी मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या बांधणीवर विशेष लक्ष दिलं. राज ठाकरेंची प्रकृती आता उत्तम असून तेही पक्ष कार्यक्रमांना स्वत: उपस्थिती लावणार असल्याची माहिती समोर आली आहे. याचाच एक भाग म्हणून १३ जुलै रोजी मनसेची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. 
 
.