शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 फेब्रुवारी 2017 (15:00 IST)

राज ठाकरे यांनी घेतली संजय तुरडे यांची भेट

पराभूत भाजपा उमेदवाराने एका मनसेच्या विजयी उमेदवारावर जीवघेणा हल्ला केलां आहे. त्या उमेदवारास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून मनसे प्रमुख  राज ठाकरे यांनी घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात जाऊन कलिनातील पक्षाचे विजयी उमेदवार संजय तुरडे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरेंनी गंभीर जखमी असलेल्या संजय तुरडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.कलीनातील वॉर्ड क्रमांक 166 मधील मनसेचे विजयी उमेदवार संजय तुरडे यांच्यावर भाजपच्या पराभूत उमेदवाराने प्राणघातक हल्ल्याचा आरोप आहे. भाजपचे उमेदवार सुधीर खातू यांच्यासह भाजपच्या 300 ते 400 कार्यकर्त्यांनी तुरडेंवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याचं म्हटलं जात आहे.त्यामुळे आता या वार्डात नेहमी हा वाद सुरु राहील असे स्थानिक म्हणत आहेत.