बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017 (16:59 IST)

‘संताप मोर्चा’चं आयोजन मनसेवर गुन्हा दाखल

विना परवानगी काढलेल्या ‘संताप मोर्चा’चं आयोजन केलं होत. हा मोर्चा एल्फिन्स्टन दुर्घटनेच्या निषेधार्थ राज ठाकरे यांनी काढला होता. यामध्ये भव्य मोर्चा काढून राज ठाकरे यांनी आपल्या मागण्या निवेदन रेल्वेला दिले आहे.  राज ठाकरेंनी ट्रकवर उभे राहत  उपस्थितांना संबोधित केलं होते.  मोर्चाच्या विरोधात आता  आयोजकांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 ‘रेल्वे प्रशासनाचा धिक्कार असो, रेल्वे प्रशासन मुर्दाबाद’ अशी घोषणाबाजी करून मेट्रो सिनेमा चौक ते चर्चगेट असा पायी मोर्चा काढला होता. यामध्ये पोलिसानी सार्वजनिक रहदारीस अडथळा केल्याचा व  जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. त्यामुळे मनसे अडचणी वाढल्या आहेत. तर १६ व्या दिवशी मनसे कसे आंदोलन करणार आहे हे नागरिक वाट पाहत आहेत. 

 ठाकरे यांनी रेल्वे प्रशासनासह भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. रेल्वे स्टेशन परिसरातले फेरीवाले येत्या 15 दिवसात हटवले नाही, तर मनसे रस्त्यावर उतरुन मनसे स्टाईलनं फेरीवाल्यांना हटवेल दम दिला आहे.