कर्जमाफीसाठी आम्ही म्हायुतीत आलो : राजू शेट्टी
शेतकरी कर्जमाफी आणि स्वामिनाथन आयोग लागू करणार यासाठी मी महायुतीत आलो होत. मात्र तसे होतांना दिसतच नाही. उलट मुख्यमंत्री कोणत्या देशात अभ्यास करायला गेले हे शोधाव लागेल. हे सरकार शेतकरी वर्गाच्या कर्जाचे धनी होतय, कृषी मूल्य ठरवणार आयोग हे सरकारच खेळणं आहे. असे म्हणत आज नाशिकमध्ये राजू शेट्टी यांनी सरकारवर तोफ डागली. ते नाशिकमधील शिवसेनेच्या कृषी अधिवेशनात बोलत होते.
मला कुणाला घाबरायची गरज नाही मी शेतकरी असून तीच भाषा बोलणार आहे. कर्जमाफी मागण्याची वेळ का आली यांच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. राज्य सरकारकडे कर्ज मागण्याची वेळ का आली यांच्या मुळाशी जण्याची गरज आहे. मात्र तसे सुद्धा सरकार करत नाही. तर हे सरकार मला वाटतंय की शेतकरी वर्गाला काही कळत नाही याचा फायदा घेतय असच चित्र आहे असे शेट्टी यांनी आपले मत व्यक्त केले.