बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 जुलै 2023 (08:13 IST)

राजू शेट्टींचं 72 तासांचं आत्मक्लेश आंदोलन मागे

raju shetty
मणिपूरच्या घटनेचा निषेध करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टीं यांनी आत्मक्लेश आंदोलन सुरु केलं .राजू शेट्टी यांच्या अन्नत्याग आंदोलनामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. राजू शेट्टी हे 72 तासांपासून आंदोलन करत आहेत.इचलकरंजी येथे गांधी पुतळा याठिकाणी आंदोलन सुरु होत. आज ते मागे घेण्यात आलं आहे.
 
आंदोलना संदर्भात बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक अत्याचार केला जातो. या घटनेने देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. हे अत्यंत क्लेशदायक आहे.

अशावेळी राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात अशा शेकडो घटना घडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या घटनेचे गांभीर्य नाही. घटना घडल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 77 दिवसानंतर प्रतिक्रिया व्यक्त करतात. सरकार असंवेदनशील झालं आहे का? असा सवाल राजू शेट्टी यांनी यावेळी केला. लोकशाहीवर प्रेम करणारा एक नागरीक म्हणून शरमेने आमची मान खाली जात आहे. वेदना होत आहे. शेवटी हे लोकनियुक्त सरकार आहे. लोकशाहीत अशा घटना घडने म्हणजे शरमेची गोष्ट आहे. एक जबाबदार नागरीक म्हणून मी आंदोलन करत असल्याची प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली .
 
Edited By - Ratnadeep ranshoor