सोमवार, 12 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 जानेवारी 2017 (16:08 IST)

पुण्याच्या संभाजी उद्यानातील नाटककार राम गडकरी यांचा पुतळा हटवला

ram gadkari
पुण्याच्या संभाजी उद्यानातील नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवण्यात आला आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हा पुतळा हटवला आहे. मात्र गडकरींचा पुतळा हटवण्यात संभाजी ब्रिगेडचा काहीही संबंध नसल्याचा दावा काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केला आहे. राजसंन्यास’ या नाटकातून राम गणेश गडकरींनी  छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. यातील मजकूर खटकल्याने संभाजी ब्रिगेडच्या 10 ते 15 कार्यकर्त्यांनी रात्री अडीचच्या सुमारास पुतळा हटवला.