बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

दुष्काळी लग्नावर उधळपट्टी शोभते का ?

पारदर्शकता आणि ‘पार्टी विथ डिफरन्स’चा नारा देणार्‍या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या मुलाच्या लग्नासाठी शाही थाटात लग्न झाले आहे. तर या लग्नासाठी तब्बल दीड लाख लग्नपत्रिका छापण्यात आल्या होत्या.त्यामुळे एका बाजूला फक्त तीन लाख खर्च करा असा सल्ला आणि हा झालेला माफक खर्च शोभतो एका ? असा प्रश्न नागरिक विचारत आहे. 
 
रावसाहेब दानवेंचा मुलगा संतोष दानवेंचं औरंगाबादमध्ये लग्न झाल आहे . त्यासाठी भव्य अशा राजमहलाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे. संतोष दानवेंच्या लग्नासाठी मोठ्या प्रमाणावर नेते मंडळी औरंगाबादमध्ये दाखल झाली होती. शहरातील सर्व हॉटेल्स पाहुण्यांसाठी बूक करण्यात आली आहेत. तर लग्नाला येणाऱ्यांसाठी शाही भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्याला अशी कोट्यवधींची उधळपट्टी शोभते का? असा प्रश्न आता विचारण्यात येऊ लागला आहे.एका बाजूला कळवला दाखवायचा आणि दुसरीकडे इतक्या प्रमाणत पैसे उधळणे शोभते का असे नागरिक विचारत आहे.