शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 एप्रिल 2022 (21:53 IST)

कुचिक यांच्यावरील बलात्कार प्रकरण, चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप

chitra wagh
शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावरील बलात्कार आरोप प्रकरणानं नाट्यमय वळण घेतलं आहे. या प्रकरणातील पीडित तरुणीनं मोठा गौप्यस्फोट करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आपल्याला गोव्यात आणि मुंबईत चित्रा वाघ यांच्या मदतीनं डांबून ठेवण्यात आलं, तसच पोलिसांना हवा तसा जबाब द्यायला वाघ यांनीच भाग पाडलं, असा गंभीर आरोप पीडित तरुणीनं केला आहे. मेसेजचे पुरावे देखील खोटे असल्याचं तरुणीनं म्हटलंय. 
 
बलात्कार प्रकरणात पीडित मुलींला पोलिसांनी इंजेक्शन देऊन अपहरण केल्याचे गंभीर आरोप चित्रा वाघ यांनी केले होते, मात्र आता पीडित मुलीने समोर येऊन चित्रा वाघ यांनी दबाव टाकून अपहरणाचं षडयंत्र रचले होतं असा धक्कादायक आरोप केला आहे. गोव्याला आणि मुंबईला चित्रा वाघ यांनीच आपल्याला डांबून ठेवलं होतं, असा आरोप पीडित मुलीने केला आहे. तसंच चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदांमध्ये दाखवलेले मेसेजचे सगळे पुरावे बनावट सॉफ्टवेअरचा वापर करुन तयार करण्यात आले होते असंही या पीडित मुलीनं म्हटलं आहे. रघुनाथ यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला बलात्काराचा गुन्हा ही चित्रा वाघ यांच्या दबावामुळेच दाखल केला असल्याचं सांगतेय.