गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 फेब्रुवारी 2017 (14:54 IST)

राष्ट्रवादी काँग्रेसवर ग्रामीण जनतेचा विश्वास...

गुरुवारी राज्यभरातील महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांचे निकाल जाहीर झाले. या निकालांनुसार ग्रामीण भागातील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे. जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा नंबर दोनचा पक्ष ठरला आहे. पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पुणे जिल्ह्यात ७८ जागा मिळाल्या आहेत तर साताऱ्यात ७६, बीडमध्ये ५१, उस्मानाबादेत ५१, अशा एकूण ६७४ जागा मिळाल्या आहेत. जिल्हा परिषदांच्या निकालानुसार पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला ४४, साताऱ्यात ३९, उस्मानाबादेत २६, बीडमध्ये २५, अशा एकूण ३६० जागी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला यश मिळाले आहे.
 
राज्यात झालेल्या निवडणुकांच्या निकालाचे अवलोकन करुन पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगल्या पद्धतीने कार्य करेल. तसेच पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय काँग्रेस व समविचारी पक्ष यांच्या सहकार्याने एकत्रितपणे काम करेल, असे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक  यांनी सांगितले आहे.