गुरूवार, 4 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 9 मार्च 2019 (09:30 IST)

आघाडीचे विदर्भातील जागा वाटप

rashatrawadi congress
विदर्भातील लोकसभेच्या जागावाटपाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील चर्चा पूर्ण झाली आहे. विदर्भातील दहा लोकसभेच्या जागांपैकी सात जागा काँग्रेस लढवणार, तर तीन जागा राष्ट्रवादी लढवणार आहे. यावर दोन्ही पक्षांची चर्चा पूर्ण झाली. पण वर्धा लोकसभेच्या जागेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दावा केल्यानं, वाद निर्माण झाला आहे.
 
विदर्भात काँग्रेसच्या वाट्याचे लोकसभा मतदारसंघ
 
नागपूर, वर्धा, चंद्रपूर,  रामटेक, गडचिरोली-चिमूर, अकोला, यवतमाळ-वाशिम
 
विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस कुठल्या जागा लढवणार
 
भंडारा – गोंदिया, बुलडाणा, अमरावती