बुधवार, 16 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (20:10 IST)

ॲप डाऊनलोड करण्यास सांगून, तरूणीला एक लाखाचा गंडा

फ्लिपकार्ट संबंधी समस्यांचे निवारण करण्यासाठी ॲप डाऊनलोड करण्यास सांगून भामट्याने तरूणीच्या बँक खात्यातून एक लाख रूपये लंपास करत ऑनलाइन फसवणूक केली.
 
निकिता संतोष गिरकर (24,रा.जोशी आर्केड झाडगाव, रत्नागिरी ) हिने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, मंगळवारी दुपारी फ्लिपकार्ट केअर सेंटर संदर्भात येणाऱ्या अडचणीबाबत तिने फोन केला होता. बोलणाऱ्या अज्ञाताने तिला एनी डेस्क ऍप डाउनलोड करण्यास सांगून त्याचा युजर आयडी मागून घेतला. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन निकिताने आयडी सांगितला असता तिच्या खात्यातून 1 लाख रुपये काढून तिची ऑनलाईन फसवणूक केली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक विनीत चौधरी करत आहेत.