सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 सप्टेंबर 2023 (12:37 IST)

गौतमीचे वडील रस्त्याच्या कडेला पडले होते बेशुद्धावस्थेत

Gautami Patil Father
नृत्यांगना गौतमी पाटीलचे वडील रवींद्र बाबुराव पाटील हे धुळे शहरापासून काही किमी अंतरावर असलेल्या सुरत बायपास रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. गौतमी पाटीलच्या वडिलांची अशी दयनीय अवस्था समजल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
 
सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. सामाजिक कार्यकर्त्यांना सुरत बायपास रस्त्यावर अज्ञात व्यक्ती मृताअवस्थेत पडलेला असल्याची माहिती मिळाली होती. यावरून ते त्या व्यक्तीजवळ पोहोचून तात्काळ त्यांना शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले.
 
सोशल मीडियावर फोटो दिल्यावर पटली ओळख 
सदर व्यक्तीची ओलख यासंदर्भात माहिती घेण्यासाठी या सामाजिक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर फोटो व्हायरल केला. नंतर संबंधित व्यक्ती हे गौतमी पाटीलचे वडील असल्याचे समोर आले.