मंगळवार, 4 फेब्रुवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 17 जून 2020 (08:00 IST)

वाचा, दहावी-बारावीचा निकाल लागणार

लॉकडाऊनमुळे दहावी-बारावीच्या परीक्षा आणि त्यांच्या निकालांवर देखील परिणाम झाला होता. या पार्श्वभूमीवर आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. ‘जुलै महिन्यात या दोन्ही परीक्षांचे निकाल लावण्याचा आमचा प्रयत्न आहे’,असं त्या म्हणाल्या आहेत. त्यामुळे लॉकडाऊन आणि कोरोनामुळे भवितव्य टांगणीवर लागलेल्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा मोठा दिलासा असल्याचं म्हटलं जात आहे. 
 
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागू नये, म्हणून हे निकाल जुलै महिन्यात लावण्याचा आमचा प्रयत्न असेल, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत. ‘कोरोना आणि लॉकडाऊनमुळे यंदा हे निकाल जवळपास महिनाभर उशिरा लागणार आहेत. आमचा असा प्रयत्न आहे की बारावीचे निकाल १५ जुलैपर्यंत आणि दहावीचे निकाल जुलै अखेरपर्यंत लावले जातील. जेणेकरून ऑगस्ट महिन्यात पुढच्या वर्षांची प्रवेश प्रक्रिया सुरू करता येईल’,असं वर्षा गायकवाड यांनी नमूद केलं आहे .