गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 जुलै 2024 (09:31 IST)

राज्यात आज अतिमुसळधार पावसाचा या जिल्ह्यांना रेड अलर्ट

राज्यात पावसाने झडी लावली आहे. सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु आहे. भारतीय हवामान विभागाने आज रायगडासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. 

तसेच  मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातार आणि कोल्हापूरसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.आज मंगळवारी अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. या बाबत लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

सध्या राज्यात अतिवृष्टी नंतर नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. रत्नागिरी, रायगडमध्ये प्रशासन अलर्ट मोडवर असून अनेकांना बाहेर काढले जात आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात कोंड, आंबेड-डिंगणी-कार्जुवे, धामणी, कसबा या भागातील फणसवणे भागात पाणी तुंबले आहे, त्यामुळे या भागांमधील वाहतूक बंद करण्यात आली आहे. सर्वांना सतर्क करण्यात आले आहे.
अति पावसामुळे नदी नाले तुडुंब वाहत आहे. धरणे भरले आहे. आज हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सांगली, सोलापूर वगळता उर्वरित जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे. 

रायगड जिल्ह्यत अति मुसळधार पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या ठिकाणी रेड अलर्ट जारी केले आहे. किनारपट्टीवरील उर्वरित जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. 
 
मराठवाडा तसेच विदर्भ जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच  उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊसाची शक्यता वर्तवली आहे. 

Edited by - Priya Dixit