सध्या सर्वत्र पावसाने हजेरी लावली असून उद्या रविवारी 25 मे रोजी हवामान खात्यानं अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान खात्याने 24 मे ते 28 मे दरम्यान राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे येत्या रविवारी 25 मे रोजी राज्यभरात रेड अलर्ट जारी केला आहे. राज्यात येत्या काही दिवसांत अनेक भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्र काल शुक्रवारी तीव्र स्वरूपात परिवर्तित झाले. यामुळे ते पुढील 24 तासांत उत्तरेकडे सरकणार असून दक्षिण कोकण आणि गोवा किनारपट्टीचे हवामान अस्थिर झाल्यामुळे कोकण, मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
या जिल्ह्यांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे.
पालघर, ठाणे आणि मुंबईत हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांतही वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे.
तर पुणे, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार, सांगली, सोलापूर, मध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता वर्तवली आहे.
तर मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, नांदेल, परभणी, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे.
विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, वर्धाम वाशीम, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, अमरावती जिल्ह्यात हलक्या ते मध्यम मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून विजांच्या कडकडाटासह झाडाखाली, उंच इमारतीखाली किंवा विद्युत खांबापासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. मासेमाऱ्यांना पुढील काही दिवस समुद्रात न जाण्याचा इशारा दिला असून गरज असल्यास नागरिकांनी बाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Edited By - Priya Dixit