संबंधित माहिती
- सोलापूरमध्ये हॉटेलच्या खोलीत रील स्टार रोहिणी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली
- महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: महाराष्ट्रात पुन्हा एकदा निवडणुकीचे रणशिंग वाजणार; १६ जागांसाठी निवडणुका जाहीर
- महाराष्ट्र विधान परिषदेच्या १७ रिक्त जागांसाठी निवडणुका पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता, पुढील आठवड्यात प्रचारमोहीम सुरू होण्याची संभावना
- सोलापूरमध्ये तिहेरी हत्याकांड, मालमत्तेच्या वादातून महिलेसह तिच्या दोन मुलांची तलवारीने हत्या
- Watermelon Capital भारतातील या शहराला ''टरबूज राजधानी'' म्हटले जाते
प्रसिद्ध रिलस्टारने स्वतःच्या हॉटेल च्या स्वयंपाकघरात गळफास घेऊन जीवन संपवले
Reel Star Rohini Paradhye Death News सोलापूर जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर आपल्या रिल्सच्या माध्यमातून अत्यंत लोकप्रिय असलेल्या २५ वर्षीय रील स्टार रोहिणी निलेश पाराध्ये यांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. ही घटना मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे घडली असून यामुळे सोशल मीडिया आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
रोहिणी पाराध्ये या विवाहित होत्या. मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. ब्रह्मपुरी येथील त्यांच्या स्वतःच्या 'हॉटेल ग्रामपंचायत'च्या स्वयंपाकघरात (पत्राच्या खोलीत) त्यांनी लोखंडी अँगलला गळफास लावला. हा प्रकार लक्षात येताच त्यांचे पती निलेश पाराध्ये यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी निलेश पाराध्ये यांनी पोलिसांत माहिती दिली असून, पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
सोशल मीडियावरील लोकप्रियता आणि व्यवसाय
रोहिणी पाराध्ये आणि त्यांचे पती निलेश हे गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर कमालीचे सक्रिय होते. त्यांचे विनोदी, सामाजिक विषयांवरील व्हिडिओ आणि खाद्यपदार्थांचे रिल्स नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले होते. याच लोकप्रियतेच्या बळावर त्यांनी रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाजवळ ब्रह्मपुरी येथे 'हॉटेल ग्रामपंचायत' नावाचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता. हा व्यवसाय चांगला चालत होता आणि ते हॉटेलच्या नवीन शाखा सुरू करण्याच्या तयारीत होते.
व्यवसाय आणि लोकप्रियता शिखरावर असतानाच रोहिणी यांनी अचानक असे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्यांच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
