शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 23 मे 2022 (22:31 IST)

‘होम मिनिस्टर’च्या माध्यमातून नात्यांची गुंफण!

अभिनेता आदेश बांदेकर यांचे प्रतिपादन
रत्नागिरी :‘झी’मराठीवरील होम मिनिस्टर कार्यक्रम 18 वर्षात घराघरात पोहोचला आह़े घरामध्ये स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन या कार्यक्रमामुळे बदलला आह़े कौटुंबिक कलह दूर होऊन नात्यांमध्ये गुंफण या कार्यक्रमाच्या माध्यमातून झाली आह़े घराघरातील संबंध अधिक दृढ झाले आहेत, असे प्रतिपादन होम मिनिस्टर फेम आदेश बांदेकर यांनी केले.
 
  शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाटय़गृह येथे आयोजित ‘महामिनिस्टर 11 लाखाची पैठणी’कार्यक्रमाच्या निमित्ताने रविवारी रत्नागिरीत आलेले आदेश बांदेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधल़ा पुढे बोलताना बांदेकर यांनी सांगितले की, महामिनिस्टर कार्यक्रमाला रत्नागिरीत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आह़े रत्नागिरीकरांचे नेहमीच आपल्याला प्रेम लाभले आह़े राज्यात एकूण 10 केंद्र करण्यात आली आहेत. त्यापैकी रत्नागिरी एक केंद्र आह़े या ठिकाणी आजूबाजूच्या जिह्यातूनही महिला आल्या आहेत़
‘होममिनिस्टर’ला 18 वर्षे पूर्ण
 
‘झी’मराठीच्या माध्यमातून 2004 साली होममिनिस्टर हा कार्यक्रम सुरू करण्यात आला होत़ा  आता कार्यक्रमाला 18 वर्ष पूर्ण झाली आहेत़  एक अँकर एक कार्यक्रम सलग 18 वर्ष चालतो, ही जगातली एकमेव घटना असाव़ी  आतापर्यंत साडेपाच हजार कार्यक्रमाचे भाग झाले आहेत़ देशभरातील साडेपाच हजार घरात होममिनिस्टरच्या माध्यमातून पैठणी पोहोचली आह़े घराघरातल्या स्त्रीचा सन्मान या पैठणीच्या माध्यमातून करण्यात येत असतो, असे बांदेकर यांनी सांगितल़े
सोने, हिरेजडीत 11 लाखाची पैठणी
 
होममिनिस्टरच्या माध्यमातून पैठणी लोकप्रिय झाली आह़े  पैठणी तयार करणाऱयांना या माध्यमातून मोठा रोजगार उपलब्ध झाला आह़े 11 लाख रुपयांच्या पैठणीत सोने, हिरेजडीत अशी असणार आह़े प्रत्येक पेंद्रातून 90 महिला निवडण्यात येणार आहेत. या महिला पुढील फेरीसाठी पात्र ठरणार आहेत़ त्यानंतर 11 लाख रुपयांच्या पैठणीची विजेती ठरणार आह़े राज्याचा विचार केल्यास मराठवाडा येथे कार्यक्रमाला तुफान असा प्रतिसाद मिळाला होत़ा महिला कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आदल्या दिवसापासून हजर झाल्या होत्या, असे बांदेकर यांनी सांगितल़े.
 
  सिद्धीविनायक ट्रस्टच्या माध्यमातून अनेक गरजू लोकांपर्यत मदत पोहोचवण्यात येत असत़े आपण स्वतः ट्रस्टच्या माध्यमातून उपचारासाठी 25 हजार रुपयांची मदत गरजूंना दिली आह़े तसेच तिवरे येथील धरण फुटल्यामध्ये बेघर झालेल्या लोकांना घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत़ तसेच कोरोना काळात व्हेंटिलेटर, आरोग्यविषयक साधने या काळात ट्रस्टच्या माध्यमातून देण्यात आली आहेत़ यापुढेही असे उपक्रम ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येतील़ व्यवसाय व राजकारणामध्ये आपण नेहमी फरक केला आह़े व्यवसायात राजकारण कधी आणले नाही तर राजकारणाचा व्यवसाय केला नाही. त्यामुळेच सिद्धीविनायकाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे, असे बांदेकर यांनी सांगितल़े
  
 रत्नागिरीत ‘महामिनिस्टर’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
रविवारी शहरातील सावरकर नाटय़गृह येथे आयोजित करण्यात आलेल्या महामिनिस्टर कार्यक्रमाला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद नेंदवण्यात आल़ा सकाळी 6 वाजल्यापासूनच महिला येथे जमल्या होत्य़ा रत्नागिरी जिह्याबरोबरच आजूबाजूच्या जिह्यातून महिला कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रत्नागिरी येथे आल्या होत्य़ा.