पंतप्रधान मोदींचा शेतकऱ्यांना दिलासा! मराठीतून म्हणाले, 'अजिबात काळजी करू नका'; महाराष्ट्रासाठी दिले मोठे आश्वासन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात मान-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे उद्घाटन केले. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मराठीतून संबोधित केले आणि त्यांना सर्वतोपरी केंद्रीय मदतीचे आश्वासन दिले.
पुण्याची बहुप्रतिक्षित 'मान-हिंजवडी ते शिवाजीनगर' मेट्रो अखेर सामान्य प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाली. आजचा दिवस पुणेकरांसाठी ऐतिहासिक दिवस ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका विशेष ऑनलाइन कार्यक्रमाद्वारे या महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन केले.
उद्घाटनानंतर, उद्यापासून या नवीन मार्गावरील सर्व १७ स्थानकांवरून प्रवाशांसाठी थेट मेट्रो सेवा उपलब्ध होईल. या मेट्रो मार्गाच्या उद्घाटनामुळे, पुण्याची वाहतूक कोंडी बऱ्या प्रमाणे कमी होईल.
मेट्रोमुळे हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या लाखो आयटी व्यावसायिकांचा आणि रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा बराच वेळ वाचेल. जेणे करून त्यांचा प्रवास सुरक्षित, जलद आणि आरामदायक होईल.
पंतप्रधान मोदी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठे अश्वासन दिले
मेट्रोच्या उद्घाटन सोहळ्याला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील संकटग्रस्त शेतकऱ्यांप्रति आपली तीव्र सहानुभूती आणि वचनबद्धताही व्यक्त केली.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबे सध्या भीषण हवामानामुळे अडचणींचा सामना करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षांत जलसंधारणाची बरीच कामे झाली आहेत, परंतु या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत.
महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बंधू-भगिनींना आश्वासन देतो की, या संकटाच्या काळात एनडीए सरकार पूर्ण संवेदनशीलतेने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे.
मोदींनी मराठीत शेतकऱ्यांना संबोधन करून अजिबात काळजी करू नका महाराष्ट्रातील दुष्काळाची मला माहिती आहे। राज्य सरकार ने मदद सुद्धा दिली आहे। मी पीएम किसान सम्मान निधी जमा केली। अजिबात काळजी करू नका आम्ही सगळे शेतकऱ्यांसोबत आहोत।असे म्हणत सर्वोपरी सहायता करण्याचे आश्वासन दिले. पंतप्रधानांच्या या हृदयस्पर्शी मराठी संवादाने राज्यभरातील शेतकऱ्यांची मने जिंकली.
पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, या कठीण काळात केंद्रातील एनडीए सरकार महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि त्यांना सर्वतोपरी आर्थिक व प्रशासकीय साहाय्य पुरवेल. पुणेकरांना आधुनिक मेट्रो वाहतुकीची महत्त्वपूर्ण भेट मिळाली आहे , तर नैसर्गिक आपत्तींशी झुंज देणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून भरीव पाठिंबा आणि आश्वासन मिळाले आहे.

