1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. RJ Shubham Keche

24 वर्षीय आर जेचा हृद्यविकाराने लाइव्ह शो दरम्यान मृत्यू

नागपुर
महाराष्ट्राची उप राजधानी असलेल्या नागपुरात 24 वर्षाच्या रेडिओ जॉकीचा ह्रदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.  शुभम केचे असं या आरजेचं नाव आहे. धक्कादायक म्हणजे लाइव्ह शोदरम्यान ब्रेकमध्येच शुभमचा मृत्यू झाला आहे.
 
शुभम रेडिओ मिर्ची अर्थात 98.3 एफएम वाहिनीत काम करत होता. तो आज सकाळी 7 ते 11 दरम्यान त्याचा ‘हाय नागपूर’ हा शो करत होता. त्यामुळे आज सुद्धा शो सुरु होता. मात्र सकाळी 9.30 च्या सुमारास, ब्रेकमध्ये तो शौचालयात गेला होता. मात्र ब्रेक उलटून गेला तरी शुभम परतला नाही. त्यामुळे त्याची शोधाशोध सुरु झाली होती.
 
सहकाऱ्यांनी शोधाशोध केल्यावर तो बेशुद्धावस्थेत आढळला होता. त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आहे. तर प्राथमिक अहवालात त्याला हृद्यविकाराचा धक्का बसला होता असे समोर आले आहे. नागपूर पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.
 
पुढील लेख
पनामा पेपर्स: नवाज शरीफ, इम्रान खान अडचणीत