बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 (11:01 IST)

उंटावरून शेळ्या हाकणारे सरकारः सचिन सावंत

केंद्रात व राज्यात उंटावरून शेळ्या हाकणारे सरकार असून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे स्तुतीपाठक होण्यापेक्षा मोदींच्या निर्णयात राज्याचे हित काय आहे ते पहावे, अशी प्रखर टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
 
गांधीभवन येथे पत्रकारपरिषदेत बोलताना सावंत म्हणाले की नोटबंदीच्या निर्णयामुळे राज्यातील जनता उध्दवस्त झाली असून केंद्र व राज्य सरकार स्वतःच दररोज नवनविन घोषणा करून राज्यात अनागोंदीचे वातावरण तयार करत आहे. दिवसेंदिवस जनतेचे प्रश्न गंभीर होत असताना गेल्या 15 दिवसांत सरकारने22 वेळा पैसे बँकेत भरणे आणि बदलून देण्याबाबतचे नियम बदलले आहेत. जनतेच्या हितासाठी नियम बदलण्याच्या वल्गना सरकारकडून केल्या जात आहेत पण यातून जनतेचे हित तर सोडाच अधिक गोंधळाचे वातावरण तयार होत असून सर्वसामान्यांना त्याचा प्रचंड मोठा त्रास सहन करावा लागतो आहे असे सावंत म्हणाले. 

पुढे बोलताना सावंत म्हणाले की, देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी राज्यसभेत केलेल्या भाषणात देशामध्ये प्रामाणिक व प्रत्यक्ष उपयोगी पडणारे निर्णय घेतले जात नाहीत अशी व्यथा व्यक्त केली आहे. त्याचीच प्रचिती सरकारच्या प्रत्येक निर्णयातून येत आहे.