सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 (17:32 IST)

महाराष्ट्राचा संभाजी काश्मिर मध्ये शहीद

आपली देश सेवा बजावत असताना महाराष्ट्र आणि देशाचा वीर पुत्र जवान शहीद झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नांदेड येथे शोककळ पसरली आहे.
 
काश्मीरमध्ये दहशतावद्यांशी भारताने कडक भूमिका घेतली आहे. तर अनेक ठिकाणी चकमक सुरु आहेत. यामध्ये नांदेडचे वीरपुत्र शहीद झाले आहेत. संभाजी यशवंत कदम असं या जवानाचं नाव असून, ते 35 वर्षांचे होते.लोहा तालुक्यातील जानापुरी गावचे रहिवासी होते. सीमेवर घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना भारतीय जवान टिपून मारत आहेत. मात्र भ्याड हल्ले करुन दहशतवादी प्रत्येकवेळी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत.याच दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देताना संभाजी कदम धारातीर्थी पडले. संभाजी कदम यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी आणि 3 वर्षांची एक मुलगी आहे.