1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 जुलै 2022 (08:56 IST)

संभाजीराजे यांची मागणी : संभाजी राजेंची मागणी : मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा

sambhaji aarakkshan
मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्या, अशी मागणी स्वराज्य संघटनेचे संस्थापक माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
 
संभाजीराजे यांनी गुरूवारी नूतन मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांची येथे भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. तसेच शुभेच्छाही दिल्या. सत्तेत आल्यावर तातडीने ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवून देऊ, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता झाली. बाठिबा आयोगाच्या अहवालानुसार सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला मंजुरी दिली. त्यानंतर आता मराठा आरक्षणाचे काय? असाही प्रश्न पुढे आला आहे. याचाच धागा पकडत संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण, मराठा समाजाचे इतर प्रलंबित प्रश्न शिंदे-फडणीस सरकारने तातडीने मार्गी लावावेत, त्यासाठी तातडीने बैठकांचे आयोजन करावे, अशी मागणी या भेटीत केली. यावेळी तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. राज्यातील गडकोटांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही संभाजीराजे यांनी या चर्चेदरम्यान, केले.