गुरूवार, 20 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 19 ऑक्टोबर 2022 (23:30 IST)

नेत्याला आमदार करा या विनंतीसाठी कार्यकर्त्यांनी लिहिले रक्ताने पत्र

sangli activist
सांगली : आताच्या राजकीय कार्यकर्त्यांकडे पाहिले की ‘नेत्यासाठी काय पण’ या म्हणीचा आपल्याला वेळोवेळी प्रत्यय येतो. अशाच एका कार्यकर्त्यांने आपल्या नेत्यासाठी काय पण असे म्हणत त्याला विधानपरिषद सदस्यासाठी संधी मिळावी म्हणून पक्षातील वरिष्ठ नेत्यांना स्वत:च्या रक्ताने पत्र लिहिले आहे.
 
इस्लामपूरचे नगराध्यक्ष आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष असलेल्या निशिकांत पाटील यांच्यासाठी आष्टा येथील प्रवीण माने या कार्यकर्त्याने हे पत्र लिहिले आहे. प्रवीण हे भाजपचे कार्यकर्ते आणि भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष असून त्यानी निशिकांत पाटील यांना विधानपरिषद सदस्यासाठी संधी मिळावी, अशा आशयाचे पत्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आपल्या रक्ताने लिहून पाठवले आहे.