1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 जानेवारी 2022 (15:29 IST)

सांगली महापालिका पोटनिवडणूक दिग्गज नेत्यांचा प्रचार व सांगता, मंगळवारी मतदान

Sangli Municipal Corporation by-election campaign of veteran leaders and concluding
महापालिकेच्या सांगली शहरातील खणभाग प्रभाग क्रमांक 16 च्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराची सांगता रविवारी झाली. प्रभाग 16 च्या एका जागेसाठी मंगळवारी अठरा रोजी मतदान होणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम , भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी सभा व रॅली काढून वातावरण ढवळून काढले.
 
माजी महापौर हारूण शिकलगार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होत असून काँग्रेस भाजपा शिवसेनेसह सहा उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसाकडून प्रभाग 16 मध्ये संचलन करण्यात आले.