1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Sangli Municipal Deputy Commissioner accused of demanding bribe

१० लाखांची लाच मागितली, ७ लाखांमध्ये करार निश्चित! महानगरपालिका उपायुक्तांवर एसीबीची मोठी कारवाई

Sangli News: महाराष्ट्रात भ्रष्टाचाराविरुद्ध शून्य सहनशीलतेचे धोरण राबविले जात आहे. याअंतर्गत लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जात आहे.

मिळालेल्या महतीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्रात भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई केली आहे आणि अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांना पकडले आहे. सांगलीतून नवीनतम प्रकरण समोर आले आहे, जिथे सांगली महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांच्यावर ७ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. या संदर्भात त्यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसीबीच्या म्हणण्यानुसार, शहरातील २४ मजली इमारतीच्या बांधकामासाठी परवानगी देण्याच्या बदल्यात उपायुक्त साबळे यांनी १० लाख रुपयांची लाच मागितली होती. नंतर, ७ लाख रुपयांचा करार निश्चित झाला. तक्रारदाराने एसीबीला याबद्दल माहिती दिली, त्यानंतर सापळा रचण्यात आला आणि वरिष्ठ अधिकाऱ्याने लाच मागितल्याचे तपासात उघड झाले. या कारवाईनंतर सांगली महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे. एसीबीचे अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
ज्याचे जास्त नगरसेवक असतील त्याला महापौरपद मिळेल, शिंदे गटाने भाजपच्या स्वप्नाला दिले आव्हान