Dharma Sangrah
✕

विदर्भातील विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी तीव्र लढा उभारणार- संग्राम कोते पाटील

Updated: शनिवार, 31 डिसेंबर 2016 (10:28 IST)

दरम्यान मोर्चानंतर विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. याबाबत बोलताना संग्राम कोते पाटील म्हणाले की, नियमानुसार परीक्षा झाल्यानंतर ४५ दिवसांच्या आत परीक्षांचा निकाल लागायला हवा. मात्र संत गाडगेबाबा विद्यापीठात निकाल लवकर लावला जात नाही. विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेची फेरतपासणीही योग्य पद्धतीने होत नाही. अनेक मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती प्रलंबित आहेत. एकूणच विद्यापीठाचा कारभार अतिशय ढिसाळ पद्धतीने सुरू आहे अशी खंत संग्राम कोते पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी संत गाडगेबाबा विद्यापीठाचे उपक्रेंद वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यात व्हावे अशी मागणीही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. या सर्व गोष्टींवर दोन आठवड्याच्या आत निर्णय घ्या अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तीव्र लढा उभारणार असा इशारा संग्राम कोते पाटील यांनी दिला.
 
गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने अनेक मोर्चे घेतले आहे. यापुढेही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस विद्यार्थांच्या न्याय-हक्कासाठी तीव्र लढा देणार असे संग्राम कोते पाटील म्हणाले.

फोटो: सोशल मीडिया

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

LIVE: आनंद दुबे यांनी मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला

मुंबई मेट्रोने भारताचा पहिला मेट्रो पासपोर्ट सादर केला; जाणून घ्या कोणत्या स्थानकांवर उपलब्ध असेल

उद्धव ठाकरे यांना सोडून आनंद दुबे यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला

पुण्यातील एका २२ वर्षीय आयटी इंजिनिअरची आत्महत्या; ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याच्या धमकीनंतर उचलले टोकाचे पाऊल

"कैसे हराया..."विधान करणाऱ्या एआयएमआयएम नगरसेविका सहार शेख यांचे वडील शिवसेनेत दाखल? वाचा

पुढील लेख
Show comments