अभिनेता सैफ अली खान च्या व्हिडिओवर संजय निरुपम यांचा प्रश्न, 5 दिवसांतच अभिनेता फिट कसे ...
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांच्यावर चाकूने हल्ला झाला. त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांना काल रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. रुग्णालयातून बाहेर पडल्याचा व्हिडिओ जारी करण्यात आला त्यात सैफ एकदम फिट दिसले. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. सैफ यांना गंभीर दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.मात्र व्हिडिओ मध्ये ते एकदम फिट दिसले.
व्हिडिओ पाहून शिवसेना शिंदे गटातील नेते संजय निरुपम यांनी प्र्श्न उपस्थित केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्टमध्ये म्हटले आहे की, डॉक्टरांनी सांगितले की, सैफ यांच्या पाठीत २.5 इंच खोलावर चाक़ू घुसला होता तो आत अडकलेला असावा. त्यांच्यावर सतत 6 तास शस्त्रक्रिया करावी लागली. हे सर्व 16 जानेवारीला घडले. मात्र 5 दिवसांतच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाले आणि ते फिट दिसत आहे.
ते निरोगी राहावे अशी आमची इच्छा आहे. त्यांच्यावर हल्ला झाल्यावर विरोधकांनी सरकारवर प्रश्न उपस्थित केले. पण आता ते रुग्णालयातून बाहेर पडल्यावर त्यांना बघून काही प्र्श्न मनात आले. की, एवढा २.5 इंच चाक़ू
पाठीत घुसल्यावर सैफ 4 दिवसांतच कसे बरे होउ शकतात. त्यांच्या घरात नौकर असताना एवढा मोठा हल्ला कसा होउ शकतो. आरोपी खरोखर बांग्लादेशी आहे की नाही हे बघावे लागणार.असे निरुपम म्हणाले.संजय निरुपम यांनी या प्रकरणाला संशयास्पद म्हटले
Edited By - Priya Dixit