1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 22 जून 2024 (20:06 IST)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोण किती जागा लढवणार संजय राऊतांनी सांगितले

sanjay raut
महाराष्ट्र विधानसभा या वर्षाच्या अखेरीस होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी माविआमध्ये जागावाटपाची चर्चा अद्याप सुरु झाली नाही. सर्व समान भागधारक आहे. त्यामुळे कोण किती जागांवर निवडणूक लढवणार असा प्रश्नच उदभवत नाही. असे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 
 
ते म्हणाले, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत माविआने एकजूट होऊन निवडणूक लढवली.आणि भाजपला पूर्ण बहुमत मिळण्यापासून रोखले. माविआ म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे, NCP शरद पवार गट आणि काँग्रेस यांचा समावेश आहे. राज्यातील 48 पैकी 30 जागा माविआ ने जिंकल्या.

यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 288 जागा असून कोणाच्या जागांची कमतरता भासणार नाही. प्रत्येक जण आरामात निवडणूक लढवणार. 

 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एसपी) पक्षाच्या एका नेत्याने पक्षाचे सुप्रीमो शरद पवार यांचा हवाला दिल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची टिप्पणी आली त्यात ते म्हणाले, की त्यांचा पक्ष लोकसभा निवडणुकीत माविआ सहयोगींच्या तुलनेत कमी जागांवर निवडणुका लढवण्यासाठी तयार झाले होतो मात्र यंदा विधानसभा निवडणुकीत परिस्थिती वेगळी असणार.   
 
राऊत म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांचा लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक स्ट्राइक रेट होता कारण त्यांनी लढवलेल्या 10 पैकी 8 जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेने (यूबीटी) 21 पैकी नऊ जागा जिंकल्या.पण विरोधकांनी सर्वाधिक लक्ष्य केल्याचा दावा त्यांनी केला. 
 
Edited by - Priya Dixit