मंगळवार, 4 मार्च 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 डिसेंबर 2022 (07:14 IST)

जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी संकल्प यात्रा काढणार

pension
एक नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी या प्रमुख मागणीसाठी  विविध विभागातील कर्मचारी जुनी पेन्शन संघटनेच्या माध्यमातून नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनावर संकल्प यात्रा काढणार आहेत. येत्या २५ डिसेंबरला सेवाग्राम वर्धा येथील बापू कुटी पासून या यात्रेस सुरुवात होणार असून २७ डिसेंबरला नागपूर येथील हिवाळी अधिवेशन सुरू असलेल्या विधिमंडळावर ही यात्रा धडकणार आहे.
 
एनपीएस योजना ही शेअर बाजारावर आधारित असल्याने या योजनेतून मिळणारी पेन्शन ही अनिश्चित स्वरूपाची आहे तसेच या योजनेत निवृत्ती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना किंवा त्यांच्या वारसांना जुन्या पेन्शन योजने प्रमाणे लाभ मिळत नसल्याचे उघड झाल्याने कर्मचाऱ्यांचा या योजनेस विरोध होताना दिसत आहे. मागील सात वर्षांपासून  राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर हिवाळी अधिवेशन, मुंबई येथील आझाद मैदान येथे मोर्चे, धरणे अशा विविध आंदोलनाच्या माध्यमातून कर्मचारी एनपीएस ला विरोध करीत असून जुनी पेन्शन योजनेची मागणी करीत आहेत.
 
पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू होते तर पुरोगामी प्रगत म्हणणाऱ्या महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना लागू का होत नाही हा संतप्त सवाल शासनास विचारण्यासाठी  जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन पेन्शन संघटनेच्या ठाणे जिल्हा शाखेने केले आहे.
Edited by: Ratnadeep Ranshoor