गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 3 एप्रिल 2017 (22:23 IST)

सप्तशृंगगडावर कायमस्वरुपी प्लॅस्टिक बंदी

सप्तशृंगगडावर कायमस्वरुपी प्लॅस्टिक बंदी करण्यात आल्याची घोषणा जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी.यांनी केली. प्लॅस्टिक पिशव्या बाळगणार्‍या व्यापार्‍यांवर कडक कारवाईचा आदेश देण्यात आला आहे. सप्तशृंगगडावर मंगळवारपासून सुरु होणार्‍या चैत्रोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी यात्रोत्सवप्रमुख तथा जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेखाली सप्तशृंगगड ग्रामपंचायत कार्यालयात बैठक झाली.

यावेळी प्लॅस्टिक बंदी व सांडपाणी-घनकचरा व्यवस्थापन या महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील व्यापारी बांधवांनी प्लॅस्टिक बंदीस सकारात्मक प्रतिसाद पाठिंबा जाहीर केला. प्लॅस्टिक बंदी व कचरा नियंत्रणासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशानुसार स्थानिक प्रशासन, राज्य परिवहन महामंडळ, महसूल विभाग, कळवण तालुका पंचायत समिती, वन विभाग, पोलीस आदी यंत्रणांमार्फत भाविकांना यात्राकाळात माहिती दिली जाणार आहे.