यावेळी प्लॅस्टिक बंदी व सांडपाणी-घनकचरा व्यवस्थापन या महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील व्यापारी बांधवांनी प्लॅस्टिक बंदीस सकारात्मक प्रतिसाद पाठिंबा जाहीर केला. प्लॅस्टिक बंदी व कचरा नियंत्रणासाठी जिल्हाधिकार्यांच्या निर्देशानुसार स्थानिक प्रशासन, राज्य परिवहन महामंडळ, महसूल विभाग, कळवण तालुका पंचायत समिती, वन विभाग, पोलीस आदी यंत्रणांमार्फत भाविकांना यात्राकाळात माहिती दिली जाणार आहे.