गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 डिसेंबर 2016 (12:33 IST)

सप्तश्रृंगी गडावर धनुर्मास सुरु

साडे तीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या वणीच्या सप्तश्रृंगी देवीचा धनुर्मास उत्सवाला सुरुवात झाली आहे. हा उत्सव १६ डिसेंबर ते १६ जानेवारी पर्यंत सुरु राहणार आहे. या धनुर्मासात सुर्यनारायण दक्षिणायन करतात. रविवार हा सूर्य देवतेचा वार असल्याने त्या दिवशी आई सप्तशृंगीच्या पुजेच्या माध्यमातून सुर्य देवतेची पुजा करण्यात आली. प्रत्येक दिवशी रविवारी श्री भगवतीच्या पंचामृत महापुजेला पहाटे ५ वाजताच प्रारंभ होतो. या पुजेची आरती तेव्हाच पार पडते जेव्हा सुर्यनारायणाची किरणे श्रीसप्तशृंगीच्या चरणावर येता क्षणी मोठ्या जयघोषात आरतीस प्रारंभ होतो. या पुजेत आईला वांग्याचं भरीत, भाकरी व तांदळाच्या खिचडीचा नैवेद्य दाखविला जातो. पुजेनंतर या प्रसादाचे भाविकांमध्ये वाटप केले जाते. धनुर्मासात येणारे सर्व रविवारांना विशेष महत्त्व असते.