गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 3 एप्रिल 2017 (22:18 IST)

सप्तश्रृंगी गडावर खाजगी वाहनांना प्रवेश बंद

चैत्रमहोत्सवानिमित्त मोठया प्रमाणात भाविक खाजगी वाहनाने कळवण तालुक्यातील सप्तश्रृंगी गड येथे येत असतात.गडावरील रस्ते अरुंद असल्याने वाहतुकीची कोंडी होतेत्यामुळे प्रवाशांच्या व यात्रेकरुंच्या जिविताला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाहीम्हणून गडावर जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सोडून भाडोत्री टॅक्सी,ऑटारिक्षाखाजगी चारचाकी व दुचाकी वाहने तसेच इतर खाजगी वाहने इत्यादी सर्व वाहनांना अपर जिल्हादंडाधिकारीरामदास खेडकर मुंबई मोटार वाहन कायदा  1988 चे कलम 115 प्रमाणे आजपासून 11 एप्रिल 2017 पर्यंत वाहतुकीस प्रवेशबंदी केली आहे