बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

सावरगाव: आई रमाई उद्यानाचे लोकार्पण

स्वच्छता आणि आरोग्य ही उत्तम जीवनशैलीची लक्षणे आहेत आणि नाशिक मधील शहरांव्यतिरिक्त गावांमध्ये देखील अशी जीवनशैली असणे हे आपले शहर आरोग्यदायी असल्याचे उदाहरण आहे. याकरता, आपल्या सामाजिक उत्तरदायित्व योजने अंतर्गत सामाजिक-आर्थिक विकास, शाश्वत पर्यावरण आणि जवळील गावांमध्ये उत्तम आरोग्याचा प्रचार आणि विविध उपक्रमांद्वारे प्रसार करणे, यावर सुलाने कायम लक्ष केंद्रित केले आहे.
 
आपल्या शाश्वत उपक्रमांसोबतच सुला विनयार्ड्सने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व योजने अंतर्गत दिलेल्या निधीतून काही महिन्यांपूर्वी गोवर्धन गावात “पर्यावरण उद्यान व आधुनिक व्यायामशाळेचे (ग्रीन जिम) लोकार्पण झाले. ग्रामपंचायती तर्फे सदर उद्यानाचे नामकरण “आई रमाई” असे करण्यात आले. त्यापाठोपाठच आता सावरगाव येथे विशेषतः लहान मुलांकरता पर्यावरण उद्यानाचे लोकार्पण झाले. यात चेस्ट प्रेस, शोल्डर प्रेस, स्काय वॉकर यांसारखे व्यायामाचे साहित्य येथे बसवण्यात आलेले आहे. गावकऱ्याकरता दिल्या गेलेल्या या सुविधे मुळे लहान मुलांना खेळ व व्यायामा करता आता हक्काची जागा मिळाली आहे.