1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 5 नोव्हेंबर 2022 (20:59 IST)

फडणवीस म्हणतात .....म्हणून मी सरकारमध्ये सहभागी होणाचा निर्णय घेतला

devendra fadnavis
आम्हाला सत्ता हवी म्हणून आम्ही सत्तापरिवर्तन केले नाही, तर गेल्या अडीच वर्षात राज्यात ज्या प्रकारे घटना घडल्या होत्या. त्यामुळे आम्ही सत्तापरिवर्तन केले. मात्र, जेव्हा तुम्ही मुख्यमंत्रीपदी राहता आणि त्यानंतर दुसऱ्या सरकारमध्ये सहभागी होता, तेव्हा तुम्ही सत्तेसाठी हपापलेले आहात, असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे मी सरकारमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, असा निर्णय घेतल्यानंतर मला वरिष्ठांनी सांगितले की, तुम्ही राज्यातील महत्त्वाचे नेते आहात. तसेच तुम्ही पूर्ण मुख्यमंत्रीही राहिले आहात. त्यामुळे आम्हाला सरकार चालवण्यासाठी तुमच्या अनुभवाची आवश्यकता आहे. म्हणून मी सरकारमध्ये सहभागी होणाचा निर्णय घेतला”,अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  जेव्हा मी मागे वळून बघतो, तेव्हा मला हा निर्णय योग्य वाटतो”,असेही ते म्हणाले.
 
“विकसीत भारताचे जे स्वप्न पंतप्रधान मोदी यांनी बघितले आहे. ते स्वप्न महाराष्ट्राशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. जर भारताला ५ ट्रिलीयनची अर्थव्यवस्था बनवायची असेल, तर महाराष्ट्राला १ ट्रिलीयन अर्थव्यवस्थेचा टप्प्यापर्यंत पोहोचावे लागेल. त्याशिवाय हे शक्य नाही. देशातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचा आमचा उद्देश आहे”, असेही ते म्हणाले.
Edited by : Ratnadeep Ranshoor