राज्यातील शाळा कॉलेजला 8 व 9 जुलै रोजी बंद राहणार
Maharashtra News: राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय 8 आणि 9 जुलै बंद असणार आहे. अखेर शाळा आणि कॉलेज बंद करण्याचे कारण म्हणजे गेल्यावर्षी अनुदानित शाळांना पुढील वाढीव अनुदान मिळण्यासाठी 1 ऑगस्ट 2024 पासून राज्यात सतत 75 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले असता सरकारने या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने 10 ऑक्टोबर 2024 रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील अनुदानित शाळांना पुढील वाढीव अनुदान देण्याची घोषणा केली होती.
तसा जीआर देखील काढण्यात आला. मात्र अनुदानित शाळांना निधीची तरतूद करण्यात आली नव्हती. आश्वासन दिले असून देखील मागणी पूर्ण झालेली नाही तसेच सरकार या कडे गांभीर्याने लक्ष देत नाही. यामुळे आता 8 आणि 9 जुलै 2025 रोजी महाराष्ट्रातील सर्वोच्च शाळा बंद राहणार.
राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. राज्यातील अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांना न्याय मिळाले नसल्याने प्रशासनाला याची आठवण करून देण्यासाठी हे दोन दिवसीय आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
हे आंदोलन राज्यातील सर्व शाळेतील शिक्षक मुंबईतील आझाद मैदानावर करण्याचे समोर आले आहे. राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून काय निर्णय घेतला जातो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
Edited By - Priya Dixit