बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 19 जून 2019 (16:31 IST)

या महिला खासदाराला पाठवले भाजपने पाच हजार ‘जय श्रीराम’ लिहिलेली पोस्टकार्ड

‘जय श्रीराम’ या वाक्यावरुन देशात राजकारण जोरात सुरु आहे. त्यात आता भाजप कार्यकर्त्यांनी अमरावतीच्या नवनिर्वाचित खासदार नवनीत राणा यांना ‘जय श्रीराम’ लिहिलेली पाच हजार पोस्टकार्ड पाठवली असून, त्यांच्या संपूर्ण जिल्ह्यत ही मोहीम राबविली जात आहे. एकट्या दर्यापूर तालुक्यातून पाच हजार पत्र खासदार नवनीत राणा यांना पाठवण्यात आली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार नवनीत राणा यांनी संसदेमध्ये भाजप खासदारांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने आक्षेप घेतला, संसदेत घोषणा नको तर मंदिरात दया असे राणा यांनी सुचवले होते. या प्रकरणी भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस अतुल गोळे, विनय गावंडे यांनी अभियान चालवण्याचे आवाहन केले. खासदार नवनीत राणा यांना भाजयुमोकडून ‘जय श्रीराम’चा मजकूर लिहून खासदार नवनीत राणा यांना पत्र पाठवण्याची प्रक्रिया सुरु केली. अमरावतीच्या दर्यापुरात मोठ्या प्रमाणात भाजप, भाजयुमो आणि इतर नागरिकांनी निषेध केला आहे, त्यानंतरच भाजप कार्यकर्त्यानी खासदार नवनीत राणा यांना ‘जय श्रीराम’ लिहिलेले 5000 पोस्ट कार्ड पाठवण्यात आले आहेत.